---Advertisement---

विम्बल्डन: रॉजर फेडरर विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

On: शुक्रवार, जुलै 14, 2017 11:26 PM
---Advertisement---

१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या  मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

७ वेळा विम्बल्डन विजेता असणाऱ्या फेडररला स्पर्धेत तिसरं मानांकन आहे. फेडरर बर्डिच हा सामना २ तास २८ मिनिटे चालला. पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही ट्रायब्रेकरमध्ये जिंकला. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६ असा जिंकला.

१-१, २-२, ३-३, ४-४, ५-५, ६-६ असा सुरु असलेला दुसऱ्या सेटमध्ये शेवटपर्यंत दोनही खेळाडूंना सर्विस खंडित करता न आल्यामुळे हा सेटही पहिल्या सेटप्रमाणे ट्रायब्रेकरमध्ये गेला.

तिसऱ्या सेटमध्ये मात्र फेडररने बर्डिचची सर्विस भेदत ६-४ असा सेट जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

ही फेडररची २९वी अंतिम फेरी असून हा एक विश्वविक्रम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment