पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरीच्या एकतर्फी झालेल्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली. 1तास 3 मिनिटे झालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 4-3 अशा फरकाने अघाडीवर असताना जॉनी ओमारा याची 8व्या गेमध्ये सर्व्हिस ब्रक केली व नवव्या गेमध्ये रोहन बोपन्नाने आपली सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
दुसऱ्या सेटमध्येदेखील रोहन बोपन्ना व दिवीज शरण जोडीने आपले वर्चस्व कायम राखले.या सेटमध्ये 2-2असे समान गुण असताना रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी पाचव्या गेममध्ये लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 4-2अशी आघाडी घेतली. पण हि आघाडी त्यांना फार काळ टिकवता आला नाही. लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांनी सहाव्या गेममध्ये रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी चतुराईने खेळ करत नवव्या गेममध्ये लूक बांब्रिज व जॉनी ओमाराची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
यावेळी दिवीज शरण व रोहन बोपन्ना म्हणाले कि, या विजेतेपदामुळे आमचा आत्मविश्वास आणखी व्दिगुणीत झाला असून स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने खेळता आले. आगामी ऑस्ट्रेलियन स्पर्धेसाठी हि स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी एक पूर्वतयारी होती.
स्पर्धेतील विजेत्या दिवीज शरण व रोहन बोपन्ना जोडीला 29,860डॉलर व 250 एटीपी गुण, तर उपविजेत्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा जोडीला 15,300डॉलर व 150एटीपी गुण देण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडियन ऑईलचे सर व्यवस्थापक विवेक गोयल, पल्लवी दराडे,व्यवस्थापन समितीचे सचिव प्रविण दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीएमसीचे महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
दुहेरी गट: अंतिम फेरी:
रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)(1)वि.वि. लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन)6-3, 6-4.