इंडियन प्रीमियर लीगच्या दुसरा टप्प्याला रविवारी (१९ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या सामन्याने सुरूवात होत आहे. इंग्लंडमधील कसोटीत दमदार कामगिरी केल्यानंतर रोहित शर्माला टी -२० मध्ये परत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. परंतु, त्यांना एक मोठा धक्का बसला. कारण हा स्टार क्रिकेटपटू नाणेफेक करण्यासाठी मैदानावर आलाच नाही, त्याच्याजागी संघाचा उपकर्णधार कायरन पोलार्ड मैदानात आला.
पोलार्डला मैदानावर येताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आणि चाहत्यांचा आवडता रोहित का खेळत नाही या विचारात ते पडले. उपकर्णधार पोलार्डने नाणेफेक करताना सांगितले की, रोहित शर्मा ठीक आहे आणि तो काही फार काळ क्रिकेटपासून दूर राहणार नाही.
विशेष म्हणजे रोहित शर्मा ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मैदानावर आलाच नव्हता. तो डाव्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करत आहे आणि बहुतेक याच कारणाने तो मैदानात आला नसावा आणि टी-२० विश्वचषक जवळ येत असताना, त्याला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी ही एक सावधगिरीचा उपाय म्हणून त्यास आराम देण्यात आला असावा, असा कयास लावला जात आहे.
पोलार्ड नाणेफेक करताना म्हणाला, ‘रोहित ठीक आहे, तो लवकर ठीक होईल, मी फक्त आजच्या सामन्यासाठी कर्णधार आहे.” मुंबईकडून त्यांचा अष्टपैलू हार्दिक पंड्याही नसणार आहे, परंतु नाणेफेक करताना त्याचे कारण सांगितले गेले नाही.
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई संघासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे फाफ डू प्लेसिस खेळाच्या अगदी आधी फिट झाला आहे. त्याला सीपीएलदरम्यान दुखापत झाली होती आणि तो सीपीएलच्या अंतिम सामन्यात तसेच बाद फेरीतही खेळला नव्हता. फाफ व्यतिरिक्त, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो आणि जॉस हेजलवूड हे चेन्नईसाठी इतर तीन परदेशी खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नया है यह! क्षेत्ररक्षकाने पकडला अफलातून झेल, पण संघसहकाऱ्याच्या चुकीमुळे अंपायरने दिला ‘सिक्स’