भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाला पावर प्लेमध्ये दोन मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली हे पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यातही रोहितचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी20 मधील खराब फॉर्म कायम राहिला.
भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुल यांनी सलामी दिली. रोहितने दुसऱ्या षटकात पॅट कमिन्स याला एक षटकार व एक चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात तो हेजलवूडच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 9 चेंडूवर 11 धावा केल्या. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये भारतात नेहमीच अशाप्रकारे कमी धावांवर बाद होत आला आहे.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सहा टी20 सामने खेळले आहेत. या सहाही सामन्यात रोहित अपयशी ठरलाय. रोहितने या सहाही सामन्यात अनुक्रमे 8, 12, 11, 8, 5 व 11 अशाप्रकारे धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेहमीच यशस्वी ठरला आहे.
रोहित हा जगातील सर्वात यशस्वी टी20 क्रिकेटपटू आहे. आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 3500 पेक्षा जास्त धावा आपल्या नावे केल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावलेला तो एकमेव फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावलेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश






