भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गड्यांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या डावात एक अशी घटना घडली, जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळाच पकडला.
भारतीय संघाने या सामन्यात शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत 208 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरुवात केली होती. त्यांनी धावांची अपेक्षित गती राखल्याने भारतीय संघ सामन्यात काहीसा मागे पडला. मात्र, उमेश यादव टाकण्यासाठी आलेल्या 12 व्या षटकात सामन्याचे रूप बदलले. या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर षटकार व चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर स्मिथ बाद झाला.
https://twitter.com/theCricketHolic/status/1572262191264591874?t=CeEfPm7rW3iZxGZ_lmXIxQ&s=19
त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हुकला. हा चेंडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने झेलला. त्याने चेंडू बॅटला लागून आपल्या हातात आल्याचे अपील केले. मात्र, पंचांनी हे अपील फेटाळून लावले. त्यावर कार्तिकने कर्णधार रोहित शर्माला तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी गळ घातली. रोहितने काहीसा विचार करत तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलत मॅक्सवेलला बाद ठरवले.
https://twitter.com/hk_tweets7/status/1572260775200456706?t=En-fNBs5M3Qq1Zm8NHbsZQ&s=19
इतर कोणालाही याबाबत माहिती नसल्याने एकट्या कार्तिकच्या हट्टामुळे भारतीय संघाला हा बळी मिळाला. त्यामुळे रोहितने आनंदाने कार्तिकला काहीतरी म्हणत त्याचा गळा पकडला. त्यांच्या या ब्रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. तसेच मीम म्हणून देखील याचा वापर होताना दिसतोय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश