---Advertisement---

विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे..! रोहितने ‘या’ गेम चेंजर खेळाडूवर उधळली स्तुतिसुमने

On: रविवार, मार्च 21, 2021 4:35 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका भारतीय संघाने ३-२ अशा फरकाने आपल्या नावे केली. भारतीय संघ मालिकेत विजयी ठरला असला तरी, भारतीय गोलंदाजांनी संमिश्र कामगिरी केली. परंतु, या दरम्यान एका पुनरागमन करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आपल्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा हा गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार.

संपूर्ण मालिकेत दोन्ही संघाचे गोलंदाज धावा लुटवत असताना भुवनेश्वरने फलंदाजांना लगाम घालण्याचे काम केले. भुवनेश्वरने एका बाजूने किफायतशीर गोलंदाजी केल्याने, भारतीय संघाचे इतर गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले.

अखेरच्या सामन्यात भुवनेश्वरची शानदार गोलंदाजी
मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात भुवनेश्वर कुमारने अनुभवी गोलंदाजाची जबाबदारी पार पाडत, भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पहिल्याच षटकात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या जेसन रॉयला त्याने खातेही न खोलू देता बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या गड्यासाठी जोस बटलर व डेव्हिड मलान यांनी १३० धावांची भागीदारी केली असताना, भुवनेश्वरने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीला येत, अर्धशतक करुन खेळत असलेल्या बटलरला तंबूत धाडले. संपूर्ण सामन्यात त्याने आपल्या ४ षटकात १५ धावा देऊन २ गडी बाद करत सामनावीर पुरस्कार मिळवला.

कर्णधार-उपकर्णधाराने केले कौतुक
संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वरचे भारतीय कर्णधाराने कौतुक करताना म्हटले, “दुखापतीनंतर भुवीचे पुनरागमन अप्रतिम राहिले.”

उपकर्णधार रोहित शर्माने त्याच्या गोलंदाजीचे कौतुक करताना सामन्यानंतर म्हटले, “भुवी आमचा प्रमुख गोलंदाज आहे. वरिष्ठ गोलंदाजाची जबाबदारी त्याने यशस्वीरित्या निभावली. या मैदानावर गोलंदाजी करणे सोपे नव्हते मात्र, त्याने अनुभव पणाला लावत, संघासाठी उत्तम कामगिरी केली.”

भुवनेश्वरने मालिकेत पाच सामने खेळताना ६.३९ च्या किफायतशीर सरासरीने चार बळी आपल्या नावे केले.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीच्या सलामीला फलंदाजी करण्याच्या निर्णयाने ‘हे’ खेळाडू मुकतील वर्ल्डकपला

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने घेतले ‘हे’ अजब निर्णय, ज्याची कारणे आहेत अनाकलनीय

गुणवत्ता असूनही भारतीय संघात ‘या’ खेळाडूंना नाही मिळाली पुरेशी संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---