भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, हे दोन्ही दिग्गज मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीत. अशात रोहित आणि विराट यांच्याविषयी चाहते आणि नेटकरी वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. पण या चर्चांना आळा घालण्यासाठी स्वतः बीसीसीआयने पुढाकार घेतला आहे.
विराट कोहली याने जानेवारी 2022 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार बनला. पण आता रोहित देखील कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. रोहित शर्मा याच कारणास्तव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही, अशा बातम्याही समोर आल्या. गुरुवारी (30 नोव्हेंबर) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ घोषित झाल्यानंतर रोहितसह विराट कोहलीचेही नाव या संघात नव्हते. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही हे दोन्ही दिग्गज उपलब्ध नसतील.
टी-20 आणि वनडे मालिकेत रोहित आणि विराट खेळणार नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माध्यमांमध्ये याविषयी वेगवेगळ्या बातम्याही समोर येत आहेत. पण या चर्चांना पूर्णविराम लागावा, यासाठी बीसीसीआयने संघांसोबत एक नोट देखील शेअर केली. या नोटमध्ये लिहिले आहे की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाकडे व्हाईट बॉल क्रिकेटमधून विश्रांतीसाठी विनंती केली होती.”
मोहम्मद शमी हादेखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत खेळणार नाहीये. शमीला कसोटी मालिकेसाठी संघात घेतले गेल, पण त्यातही तो खेळणार, अशी खात्री दिली गेली नाहीये. शमीविषयी बीसीसीआयने माहिती दिली की, “मोहम्मद शमीवर उपचार सुरू आहेत आणि फिटनेस पाहून तो संघासाठी उपलब्ध असेल की नाही, हे ठरवले जाईल.”
(Rohit and Virat will not play the T20I and ODI series against South Africa, BCCI said)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेले भारताचे टी-20, वनडे आणि कसोटी संघ –
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, तिलक वर्मा व मोहम्मद सिराज.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर.
महत्वाच्या बातम्या –
टी20 मध्ये रोहित-विराटच्या पुढे विचार करतेय बीसीसीआय? युवा खांद्यांवर वर्ल्डकपची जबाबदारी?
रहाणे-पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात जागा बनवण्यात अपयशी






