---Advertisement---

रोहीतच्या नावावर असाही एक पराक्रम ज्याचा विचार काही खेळाडू फक्त करु शकतात!

On: सोमवार, जुलै 9, 2018 9:10 AM
---Advertisement---

ब्रिस्टल | भारताने ब्रिस्टल येथिल कौंटी क्रिकेट मैदानावर तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला.

भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोहित शर्माने शतक करत जगात कोणत्याच क्रिकेटपटूला जमली नाही अशी कामगिरी केली आहे.

१९९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने हे आव्हान १८.४ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा ५६ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितच्या या खेळीमध्ये ११ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

या शतकाबरोबरच रोहितने जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन शतके करण्याऱ्या न्युझीलंडच्या कॉलिन मुन्रोची बरोबरी केली.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता रोहित शर्मा आणि कॉलिन मुन्रो संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहेत.

कॉलिन मुन्रोने ४५ टी-२० सामन्यात ३ शतके केली आहेत. तर रोहित शर्माला टी-२० मध्ये ३ शतके करण्यास ८४ सामने लागले.

तसेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

रोहितने २५ कसोटी सामन्यात ३, १८० एकदिवसीय सामन्यात १७ आणि ८४ टी-२० सामन्यात ३ शतके केली आहे.

हा सामना जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या-

-असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय!

-भारताने मालिका तर जिंकली पण हे ५ विक्रमही केले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment