---Advertisement---

सरफराजचं ऐकलं असतं तर झॅक क्रॉली 79 धावा करूच शकला नसता, पाहा रोहित शर्मा कुठे चुकला

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी धरमशाला याठिकाणी सुरू झाला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर झॅक क्रॉली याने पहिल्याच दिवशी मोठी खेळी केली. भारतीय संघाकडे क्रॉलीला बाद करण्याची संधी होती. पण कर्णधार रोहितने सरफराज खान याचे म्हणणे ऐकले नाही, म्हणून क्रॉली 79 धावांपर्यंत मजल मारू शकला.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 38व्या षटकात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गोलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुलदीप झॅक क्रॉली (Zak Crawley) याचा त्रिफळा उडवला. सलामीवीर फलंदाज शतक करेल असे वाटत होते. पण भारतीय फिरकीपटूने त्याला वैयक्तिक 79 धावांवर बाद केले. यासाठी त्याने 108 चेंडू खेळले. 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या.

असे असले तरी, भारतीय संघ क्रॉलीला वैयक्तिक 61 धावांवर बाद करू शकत होता. त्यावेळीही कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. डावातील 26व्या षटकात कुलदीपचा एक चेंडू क्रॉलीच्या बॅटला स्पर्श करून लेग साईडला उभ्या असलेल्या सरफराज खान याच्या हातात गेला. सर्वांनी विकेटसाठी अपील केली. पण पंचांनी फलंदाज नाबाद असल्याचे सांगितले. पंचांच्या या निर्णयाशी सरफराज मात्र सहमत नव्हता. क्रॉली बाद झाल्याची खात्री युला फलंदाजाला होती. त्याने कर्णधार रोहितकडे डीआरएस घेण्याची मागणी देखील केली होती. पण रोहितने त्याकडे दुर्लक्ष केले आणि क्रॉलीला जीवनदान मिळाले. कारण काही वेळाने रिप्लेमध्ये असे समजले की, चेंडू क्रॉलीच्या बॅटला लागून सरफराजच्या हातात आला होता.

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
काय सांगता! क्रिकेटच्या देवाची विकेट Bigg Boss विजेत्या मुनवर फारुकीनं घेतली! पाहा Video
Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---