आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होईल. दरम्यान शुभारंभ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आमने-सामने असणार आहेत. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हंगामातील संघाच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही.
शेवटच्या आयपीएल हंगामात साखळी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) स्लो ओव्हररेटमुळे हार्दिकला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्याला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. यामुळे तो या हंगामातील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. सीएसकेविरुद्ध बंदी घालण्यात आल्यानंतर, हार्दिक (29 मार्च) रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध दुसऱ्या सामन्यासाठी परतेल.
अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या (MI) नेतृत्वाची जबाबदारी कुणाकडे असणार? असे प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडले असतील. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया, की हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबईच्या संघाची धुरा कुणाकडे असेल?
हार्दिकच्या अनुपस्थितीत, रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे चेन्नईविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करण्यासाठी दावेदार आहेत. मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकले होते. आयपीएल 2024च्या आधी हार्दिकची त्याच्या जागी नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे हार्दिकला वानखेडेवर आणि घराबाहेर सामन्यांदरम्यान मुंबई चाहत्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला. सूर्यकुमारबद्दल बोलायचे झाले तर, त्याने संघाचे नेतृत्व केले आहे आणि बुमराह अलिकडच्या काळात भारतीय संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत त्याचा कर्णधारपदाचा दावाही मजबूत आहे. आता पहिल्या सामन्यात तिघांपैकी कोणाला कर्णधारपदाची संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मुंबईचा संघ- जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, मुजीब उर रहमान, विल जॅक्स, अश्विनी कुमार, मिशेल सँटनर, रीस टोपली, कृष्णन श्रीजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिजाद विल्यम्स, विघ्नेश पुथुर
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! भारतीय संघाच्या सराव सत्रात चौकार-षटकारांचा पाऊस
आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचा घटस्फोट, 14 वर्षांच्या नात्याला झाला अंतिम विराम
लाहोरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा शानदार उद्घाटन सोहळा, संगीत आणि सेलिब्रेशनचा जल्लोष





