भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषका दरम्यानचा सामना दुबई येथे खेळला गेला. तब्बल चार वर्षानंतर होत असलेल्या या आशिया चषकातील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्वतः रोहित शर्मा याने एक खेळाडू म्हणून मैदानावर उतरतात आशिया चषकाच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा यासोबत सलग दुसऱ्यांदा आशिया चषकात नेतृत्व करतोय. मात्र, खेळाडू म्हणून आशिया चषकात पुत्र त्याने एक नवा विक्रम आपल्या नावे नोंद केला.
रोहित तब्बल सातव्यांदा आशिया चषक खेळतोय. त्याने 2010 मध्ये श्रीलंकेत झालेल्या पहिल्या आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हापासून तो सलग सातव्यांदा आशियाच्या रणांगणात उतरला. यापूर्वी हा विक्रम भारताचा सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या नावे होता. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या संपन्न कारकिर्दीत सहा वेळा आशिया चषकात आपले कौशल्य दाखवलेले. रोहित कर्णधार म्हणून सलग दुसऱ्यांदा आशिया चषक खेळतोय. यापूर्वी 2018 मध्ये रोहित नेतृत्व करत असताना भारताने वनडे प्रकारात झालेला आशिया चषक जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फकरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत
ना सचिन ना धोनी; मैदानावर उतरताच विराट बनला ‘नंबर वन’
भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला