बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज (2जूलै) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.
त्याने या सामन्यात 92 चेंडूत 104 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. त्याचे हे या विश्वचषकातील चौथे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर रोहितचे हे विश्वचषकातील एकूण पाचवे शतक आहे.
तसेच रोहितने या सामन्यात केएल राहुलबरोबर सलामीला फलंदाजी करताना 180 धावांची सलामी भागीदारीही रचली आहे.
रोहितच्या आजच्या या खेळीनंतर रोहितचे 2011 च्या विश्वचषकाआधीचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2011 च्या विश्वचषकात रोहितचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याने 2011 च्या विश्वचषकाआधी भारतीय संघात संधी न मिळाल्याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. रोहितचे हेच ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
रोहितने 2011 च्या विश्वचषकाआधी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले होते की ‘विश्वचषकासाठी संघात संधी न मिळल्याने खूप खूप निराश झालो आहे. येथून आता मला पुढे जायला हवे. पण खरंच हा मोठा धक्का होता.’
Really really disappointed of not being the part of the WC squad..I need to move on frm here..but honestly it was a big setback..any views!
— Rohit Sharma (@ImRo45) January 31, 2011
रोहितने या विश्वचषकानंतर चांगली कामगिरी करत भारतीय संघातील स्थान पक्के केले. तसेच तो नंतर 2015 च्या विश्वचषकातही भारतीय संघाकडून खेळला. आता 2019 च्या विश्वचषकात खेळताना तो या विश्वचषकातील सध्याचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 2019 च्या विश्वचषकात 7 सामन्यात 4 शतकांसह 544 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप १०: बांगलादेश विरुद्ध शतकी खेळीबरोबरच हिटमॅन रोहित शर्माने केले हे खास १० विक्रम
–आता रोहित शर्माचे नाव सचिन तेंडुलकर बरोबर आदराने घेतले जाणार
–‘हिटमॅन’ रोहित शर्माने एमएस धोनीच्या या मोठ्या विक्रमाला टाकले मागे






