---Advertisement---

रांची कसोटीत पावसाबरोबरच रोहित शर्माही बरसला, केले हे खास ५ विक्रम

On: शनिवार, ऑक्टोबर 19, 2019 6:51 PM
---Advertisement---

रांची। आजपासून(19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या या सामन्यातील आज पहिल्या दिवसाचा खेळ पावसाचा व्यत्यय आल्याने 58 षटकांनंतर थांबवण्यात आला आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 3 बाद 224 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली. षटकार मारत हे कसोटी शतक पूर्ण करणाऱ्या रोहितने पहिल्या दिवसाखेर 164 चेंडूत नाबाद 117 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले.

रोहितचे हे 2019 या वर्षातील सलामीवीर फलंदाज म्हणून हे एकूण 9 वे शतक ठरले. तसेच सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील त्याचे एकूण 3 रे शतक ठरले आहे.

या शतकाबरोबरच रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

रोहितने केले हे खास विक्रम – 

#एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर फलंदाज –

9 – सचिन तेंडूलकर – 1998

9 – ग्रॅमी स्मिथ – 2005

9 – डेव्हिड वॉर्नर – 2016

9 – रोहित शर्मा – 2019

8 – गॅरी कर्स्टन – 1996

#सर्वाधिकवेळा षटकार ठोकत कसोटी शतक पूर्ण करणारे भारतीय क्रिकेटपटू –

6 वेळा – सचिन तेंडूलकर

2 वेळा – रोहित शर्मा

2 वेळा – गौतम गंभीर

#एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज-

17 – रोहित शर्मा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)*

15 – शिमरॉन हेटमेयर (वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश, 2018)

#एका कसोटी मालिकेत 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज –

रोहित शर्मा – 3 शतके (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)

सुनील गावस्कर – 4 शतके (भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, 1971)

सुनील गावस्कर – 3 शतके (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1977-78)

सुनील गावस्कर – 4 शतके (भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, 1978-79)

#कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

17 षटकार – रोहित शर्मा

13 षटकार – बेन स्टोक्स

8 षटकार – मयंक अगरवाल

7 षटकार – रविंद्र जडेजा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---