मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोहित शर्मा भारताचा कसोटी कर्णधार बनला. दक्षिण आफ्रिका दौरा झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित संघाचा कर्णधार बनला, जो आजही संघाचे नेतृत्व करत आहे. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार रोहितला कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यात जराही रस नव्हता. तेव्हाचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या आग्रहामुळे रोहितने ही जबाबदारी स्वीकारला.
बीसीसीआय (BCCI) सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये अशी माहिती दिली गेली आहे की, “त्यावेळी बीसीसीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (गांगुली आणि शहा) रोहित शर्मा (Rohit Sharma) याला यासाठी तयार केले. केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आपल्या कर्णधारपदाची छाप सोडू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर रोहितला कर्णधारपदासाठी तयार केले गेले.” दरम्यान रोहितच्या नेतृत्वात भारताने मायदेशात श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 अशा अंतराने जिंकली. 2021 साली इंग्लंड दौऱ्यात भारताचा एक कसोटी सामना खेळायचा राहिला होता, जो मागच्या वर्षी जुलै महिन्यात पुन्हा आयोजित केला गेला होता. पण या सामन्यात कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला.
त्यानंतर रोहित बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांतीवर होता. 2023 बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत त्याच्याच नेतृत्वात भारताने 2-1 असा विजय मिळवला. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना देखील रोहितच्या नेतृत्वात खेळला गेला. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभूत झाला.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन आणि नेतृत्व दोन्हींवर टीका झाली. लवकरच रोहितला संघाचे कर्णधारपद सोडावे लागणार, अशा चर्चाही सुरू आहेत. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कर्णधारपद सोडण्याची वेळ येणार नाही. पण निवडकर्त्यांना त्याच्या वैयक्तिक प्रदर्शनावर आणि नेतृत्वार येत्या काळात निर्णय घ्यावा लागू शकतो. दरम्यान, भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यानंतर एक महिन्याच्या विश्रांतीवर आहे. संघ जुलै -ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात देखील संघ व्यवस्थापनाकडून रोहितला विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Rohit Sharma accepts Test captaincy at Sourav Ganguly and Jay Shah’s insistence – Sources)
महत्वाच्या बातम्या –
सेहवाग-गावसकरांना नैतिकतेचे धडे देणारा गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर, म्हणाले, “तू करून बसला अन्…”
मैदानावर न उतरताही अश्विन-पंतने राखली टीम इंडियाची लाज! वाचा नक्की काय घडलं