हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा, भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जातो. क्वचितच असा एखादा गोलंदाज असेल, ज्याच्या सामना करताना रोहितला अडथळा येत असेल. पण, भारतीय संघात असा एक गोलंदाज आहे. ज्याच्यासमोर नेट्समध्ये सराव करतानाही रोहितला घाम फुटतो. हा गोलंदाज अजून कोण नसून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. Rohit Sharma afraid to bat on mohammed shami and jasprit bumrah bowling
रोहितने त्याच्या फलंदाजीचे हे गुपित भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेजसोबत शेअर केले आहे.
रोहित म्हणाला की, “शमीला नेटमध्ये सराव करताना गोलंदाजी करायला जास्त आवडत नाही. तो म्हणतो की, कसोटी सामन्यात एका गोलंदाजाला कमीत कमी २५ षटके टाकावी लागतात. त्यामुळे शरीर खूप थकून जाते. अशात पुन्हा नेटमध्ये का त्रास करून घ्यायचा.”
सरावादरम्यान शमीच्या गोलंदाजीचा सामना करणे खूप कठीण आहे. तो सतत फलंदाजांना बाउंसर चेंडू टाकत, सरावात गोलंदाजी करण्याचा त्याचा राग काढत असतो. रोहितच्या मते, कोणताही गोलंदाज सामन्यातील त्याचे फस्ट्रेशन सरावामध्ये काढत असतो. त्यातही तेथील खेळपट्टीत गवताचे प्रमाण जास्त असते आणि तिथे ओलावाही असतो. अशी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप आवडते.
रोहित म्हणाला की, “शमीलाही अशी खेळपट्टी आवडते. जर त्याला अशा खेळपट्टीवर सराव करण्याची संधी मिळाली तर तो जास्तीची बिर्यानी खातो आणि फलंदाजांवर त्याचा कहर काढत असतो.”
शिवाय रोहित म्हणाला की, “भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरही खेळायला मला भीती वाटते. परंतु, मी शमीसोबत जास्त खेळलो आहे. त्याच्यासोबत मी २०१२-१३ पासून खेळत आहे, म्हणून त्याची गोलंदाजी मला अधिक कठीण वाटते. एवढेच नाही तर, नेटमध्ये कोण जास्त फलंदाजांना बाद करेल, अशी शमी आणि बुमराह या दोघात स्पर्धा चालू असते. अशात, त्रास मात्र फलंदाजांना झेलावा लागतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २० नियम
क्रिकेट कारकिर्द संपली की हा धडाकेबाज फलंदाज होणार शुटर, ऑलिंपिक्स…
सनी लियाॅनबरोबर डिजे ब्रावोचा लाईव्ह डान्स, सोशल मीडियावर झाली एकच…