---Advertisement---

आश्चर्यकारक! यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित-बटलरची आकडेवारी समान

On: बुधवार, जून 26, 2024 10:48 PM
Rohit And Buttler
---Advertisement---

या विश्वचचषक स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यांचा थरार गुरुवारी (27 जून) रोजी रंगणार आहे. तत्पूर्वी क्रिकेटमध्ये असे अनेक क्षण आहेत, जे पुन्हा परत येत नाहीत. असे अनेक विक्रम आहेत जे विसरता येणार नाहीत. टी20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जोस बटलरच्या (Jos Buttler) नावावर असाच विक्रम झाला आहे, जो याआधी क्वचितच कोणत्याही दोन कर्णधारांमध्ये पाहायला मिळाला असेल.

गुरुवारी (27 जून) भारत आणि इंग्लंड सेमीफायनलसाठी मैदानात उतरतील तेव्हा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) यांच्या नावावर समान धावा असतील. रोहित आणि बटलरची केवळ धावांच्या बाबतीतच आकडेवारी समान नाही तर स्ट्राइक रेट आणि चेंडू खेळण्याच्या बाबतीतही बरोबरीचे आकडे आहेत.

रोहित शर्मा आणि जोस बटलर यांनी या टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 6 डावात फलंदाजी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आपल्या 6 डावात समान 120 चेंडू खेळले आहेत. एवढंच नाही तर रोहित आणि बटलरनं चालू स्पर्धेत 191-191 धावा केल्या आहेत. दोघांचा स्ट्राइक रेट 159.16 राहिला आहे. जो समान आहे.

रोहित शर्मा या टी20 विश्वचषकात एकदा नाबाद परतला आहे तर जोस बटलर दोन वेळा नाबाद राहिला आहे. त्यामुळे बटलरची सरासरी (47.75), रोहित शर्मा (38.20) पेक्षा थोडी चांगली आहे. परंतू सर्वोच्च धावसंख्येच्या बाबतीत रोहित शर्मा पुढं आहे. रोहितनं चालू विश्वचषकात 92 धावांची खेळी खेळली आहे. बटलरची सर्वोत्तम खेळी 83 धावांची आहे. बटलर आणि रोहित चौकार मारण्याच्या बाबतीतही जवळपास आहेत. रोहितनं 16 षटकार आणि 13 चौकार मारले आहेत. तर बटलरनं 18 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा ‘हा’ गोलंदाजी रेकाॅर्ड निघणार का मोडीत?
टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित-विराटचं वर्चस्व! पहा आकडेवारी
रॉबिन्सननं एका षटकात दिल्या 43 धावा! 134 वर्षात पहिल्यांदाच घडला इतिहास, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---