---Advertisement---

क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही

---Advertisement---

डब्लिन। भारतीय संघाने 27 जूनला पार पडलेल्या आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 76 धावांनी विजय मिळवत आयर्लंड-इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने रचलेल्या विश्वविक्रमी भागिदारीच्या जोरावर 5 बाद 208 धावांचा डोंगर उभा केला होता.

या सामन्यात रोहित-शिखरच्या जोडीने 160 धावांची सलामी भागिदारी रचली. याबरोबरच रोहित-शिखर यांची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन वेळा 150 पेक्षा जास्त धावांची भागिदारी रचणारी पहिली जोडी ठरली आहे.

याआधी मागच्या वर्षी दिल्लीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सामन्यात या जोडीने 158 धावांची भागिदारी रचली होती.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 5 वेळा 150 पेक्षा जास्त धावांची पहिल्या विकेटसाठी भागिदाऱ्या झाल्या आहे. त्यातील 3 भागिदाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना 1000 पेक्षा जास्त धावा करणारी रोहित-शिखरची दुसरीच जोडी ठरली आहे. त्यांच्या जोडीने सलामीला खेळताना 1103 धावा केल्या आहेत.

याआधी हा कारनामा डेविड वॉर्नर आणि शेन वॉटसनच्या जोडीने केला आहे. त्यांनी सलामीला खेळताना 1108 धावा केल्या आहेत.

आयर्लंड विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात शिखरने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 45 चेंडूत 74 धावा केल्या. तर रोहितने 61 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्याचे टी20तील तिसरे शतक थोडक्यात हुकले. त्याच्या या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार मारले.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावांची पहिल्या विकेटसाठीच्या भागिदाऱ्या:

171 धावा: केन विलियमसन – मार्टीन गप्टिल

170 धावा: ग्रॅमी स्मिथ – लुटस् बोस्मन

165 धावा: रोहित शर्मा – केएल राहुल

160 धावा: रोहित शर्मा – शिखर धवन

158 धावा: रोहित शर्मा – शिखर धवन

महत्त्वाच्या बातम्या:

टी२०मध्ये ६ हजार धावा करणारा शिखर धवन ६वा भारतीय

माजी कॅप्टन कूल एमएस धोनीसाठी आजचा दिवस खास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment