आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभूत केले आहे. या सामन्यात आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा हा सहावा पराभव असून दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव आहे. आरसीबीने केकेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर मुंबई संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे, तर आरसीबी या विजयानंतर तिसरे स्थान कायम ठेवले आहे. सामना संपल्यानंतर आयपीएलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू दिसत आहेत.
सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित निराश दिसला. त्याने संघाच्या फलंदाजांना यासाठी जाबाबदार ठरवले आहे. तसेच आयपीएलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्येही रोहित निराश दिसत आहे. या व्हिडिओत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली विजयाचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओत इतरही खेळाडू आणि चाहते दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CUS0Bu2Fins/?utm_source=ig_web_copy_link
आरसीबीविरुद्ध मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती, पण त्याच्यानंतरच्या फलंदाजांनी खूपच खराब खेळी केली. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया देताना गोलंदाजांचे कौतुक केले, पण फलंदाजांना सुनावले आहे. तो म्हणाला, “मला वाटते आम्ही चांगली गोलंदाजी केली. एक वेळी वाटत होते की धावसंख्या १८० च्या पार जाईल. फलंदाजांनी आम्हाला निराश केले. आता हे सतत होत आहे. फलंदाजांसोबत आमची चांगली चर्चा झाली आहे. जे आतमध्ये फलंदाजी करायला लागले होते, त्यांनी मैदानावर वेळ घालवावा लागेल. एक- दोन विकेट गमावल्यानंतर त्यांनी आमच्यावर दबाव बनवून ठेवला. आम्ही ज्या परिस्थितीत आहोत, तेथून पुनरागमन करणे गरजेचे आहे.”
दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आरसीबीने २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघातील फलंदाज अपयशी ठरलेले दिसले. मुंबई संघ १८.१ षटकात १११ धावा करून सर्वबाद झाला. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने पहिल्यांदाच मुंबईला सर्वबाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष