भारताचा संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळतो आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाने मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली आहे. शनिवारी (१९ फेब्रुवारी) आयसीसीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
जानेवारी महिन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने गमावल्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्याच्या जागी ३४ वर्षीय रोहितला कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.
४ मार्च ते १६ मार्च दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपासून रोहित कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून काम पाहिल.
रोहितची कसोटी कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. त्याचा कसोटीतील अनुभव पाहता संघ व्यवस्थापनाने त्याच्या ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत त्याने कसोटी कारकिर्दीत ४३ सामने खेळले असून उल्लेखनीय अशा ४६.८७ च्या सरासरीने ३०१७ धावा काढल्या आहेत. यापैकी सर्वाधिक धावा त्याने सलामीला फलंदाजी करताना काढल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १ द्विशतक, ८ शतके आणि १४ अर्धशतके आहेत.
🚨 JUST IN: India have named their new permanent Test captain.
Details 👇https://t.co/lgLdDROGyE
— ICC (@ICC) February 19, 2022
श्रीलंकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार
कसोटी मालिका वेळापत्रक-
४-८ मार्च – पहिली कसोटी, मोहाली
१२-१६ मार्च – दुसरी कसोटी, बेंगळुरू (दिवस-रात्र)
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, बुमराहची उपकर्णधारपदी निवड
विजयानंतरही कर्णधार रोहितने टोचले टीम इंडियाचे कान; म्हणाला…
रोहितने विराटचा ‘तो’ सल्ला ऐकला आणि विजयाचा मार्ग झाला सुकर