भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही सामन्यांपासून मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याला टिकेचा सामना करावा लागत आहे. रविवारी (१० जुलै) झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यातही तो फार काही खास करू शकला नाही. असे असले तरी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याची पाठराखण केली आहे.
विराटने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ६ चेंडूत ११ धावांची खेळी केली होती. हा सामना भारत १७ धावांनी हरला. असे असले तरी मालिकेत मात्र भारताने २-१ असा विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर बोलताना रोहितने विराटला पाठिंबा दिला आहे.
त्याने म्हटले आहे की, ‘बाहेरचे लोक काय बोलत आहेत, त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. हे कोण लोक आहेत, जे असे व्यक्तव्य करतात. मला आजपर्यंत हे समजलेले नाही की, त्यांना क्रिकेटतज्ञ का म्हटले जाते.’
तो पुढे म्हणाला, ‘ते लोक बाहेरून खेळ पाहात आहे, त्यांना आत काय चालले आहे, हे माहित नाही. आमची रणनीती वेगळी असते. आम्ही एक संघ बनवतो, त्याच्या मागे काही विचार असतात. बाहेर काय चालले आहे, ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आम्हाला काय पाहिजे, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.’
तसेच रोहित म्हणाला, ‘जर तुम्ही फॉर्मबद्दल बोलत असाल, तर हे सर्वांबरोबरच होत असते. सर्वांचाच फॉर्म पुढे-मागे होत राहातो. पण खेळाडूचे कौशल्य कधी खराब होत नसते. हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे. आम्ही त्या कौशल्याची काळजी घेतो, त्यालाच पाठिंबा देतो. हे माझ्याबरोबरही झाले आहे, सर्वांबरोबरच झाले आहे. जेव्हा एखादा खेळाडू इतकी वर्षे संघासाठी चांगली कामगिरी करत असेल आणि तो एक किंवा दोन, तीन मालिकेत खराब कामगिरी करत असेल, तरी त्या खेळाडूकडे दुर्लक्ष करून चालत नाही.’
कर्णधार रोहित असंही म्हणाला की, ‘लोकांना हे समजणे, वेळ लागेल. पण जे आम्ही संघात आहोत, त्यांना माहित आहे, एक प्रतिभाशाली खेळाडू संघात असण्याचे महत्त्व किती आहे. मी बाहेरच्या लोकांना एवढेच सांगेल, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या बोलणे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही.’
काही दिवसांपूर्वीच विराटवर माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी टीका केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी
जोकोविचने सातव्यांदा काबिज केले विम्बल्डनचे जेतेपद; ‘या’ यादीत फेडररलाही टाकले मागे




