ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या रंगतदार सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. सोबतच तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी पटकावली. या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांना अपार आनंद झाला.
मात्र आनंदाच्या भरात भारतीय सलामीवीर रोहित शर्माच्या तोंडून अपशब्द निघाले. यावेळचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
जल्लोषात रोहितच्या भावना अनावर
झाले असे की, सामन्याच्या शेवटच्या ९६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने शार्दुल ठाकूरची विकेट काढली. त्यानंतर भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावांची आवश्यकता होती. अशात पंतने खणखणीत चौकार मारत सामन्याचा विजयी शेवट केला. पंतच्या या जबरा चौकाराला पाहून सामना विजयाच्या उत्साहाने मैदानाबाहेर बसलेले भारतीय खेळाडू वेगाने धावत मैदानावर उतरले.
यावेळी स्टेडियममध्ये बसून सामना पाहात असलेले रोहित आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनीदेखील आनंदाने उभारुन एकमेकांना मिठी मारली. यावेळी जल्लोषात रोहितच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्या तोंडून शिवी निघाली. यावेळचा रोहितचा व्हिडिओ चाहत्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहितचा आवाज स्पष्टपणे ऐकायला येत नाही. मात्र त्याच्या लिप्सिंगवरुन त्याने अपशब्द उच्चारल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
THIS HUG. OH GOD MAN. PROTECT. 🥺❤
also that behenchod 😂😭@ajinkyarahane88 @ImRo45#AUSvsIND #AjinkyaRahane #RohitSharma pic.twitter.com/8WhhMWALJE— Riddhima (@RiddhimaVarsh17) January 19, 2021
https://twitter.com/_harshareddy/status/1351439855671103488?s=20
असा झाला थरारक ब्रिस्बेन कसोटी सामना
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.
प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुझ्याशिवाय आयपीएल पहिल्यासारखं असणार नाही”, मलिंगाच्या निवृत्तीने रोहित आणि बुमराह झाले भावूक
एक केदार जाधव गेला अन् दुसरा आला! सीएसकेच्या ताफ्यात सहभागी झालेला उथप्पा चाहत्यांकडून ट्रोल
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका हा संघ जिंकेल, मायकल वॉन यांची पुन्हा भविष्यवाणी