रोहित शर्माने (Rohit Sharma) आजच्याच दिवशी २०१९मध्ये वनडे विश्वचषकातील पाचवे शतक लगावले होते. याबरोबर एकाच वनडे विश्वचषकात ५ शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२, पाकिस्तानविरुद्ध १४०, इंग्लंडविरुद्ध १०२, बांगलादेशविरुद्ध १०४ व श्रीलंकेविरुद्ध १०३ धावा केल्या होत्या.
वनडे विश्वचषकात आजपर्यंत ११४३ खेळाडू खेळले असून आजपर्यंत कुणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी भारतीय संघाला हा विश्वचषक जिंकता आला नव्हता.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)