---Advertisement---

कर्णधार रोहितचा विजयरथ सुस्साट; कमी वेळातच कोहली, कपिल देव यांना मागे सोडत बनला ‘एक नंबर’

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 4:39 PM
Captain-Rohit-Sharma
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (West Indies Tour Of India) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका (3 Matches ODI Series) सुरू आहे. अहमदाबादच्या मैदानावर ही मालिका खेळली जात आहे. या मालिकेपासून रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारताच्या वनडे संघाची सूत्रे हाती घेतली आहेत. आतापर्यंत या मालिकेतील पहिले २ सामने झाले असून रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे दोन्हीही सामने जिंकले आहेत. यासह रोहितने कर्णधार म्हणून मोठा विक्रम केला आहे. त्याने भारताच्या वनडे संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मागे सोडत ही किमया साध्य केली आहे. 

बुधवारी (०९ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघांमध्ये झालेला दुसरा वनडे सामना (Second ODI) भारताने ४४ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत रोहित सर्वात कमी सामन्यांमध्ये संघांला १० विजय मिळवून देणारा (Least ODI Matches Taken For 10 Win) भारतीय कर्णधार बनला आहे. रोहितने आतापर्यंत फक्त १२ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी केवळ २ सामने गमावत त्याने १० सामना विजयांचा आकडा पूर्ण केला आहे. याबरोबरच त्याची वनडेतील विजयी सरासरी ८३.३३ इतकी राहिली आहे.

यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० विजय मिळवण्याता विक्रम विराटच्या नावे होता. त्याने कारकिर्दीतील अवघ्या १३ व्या वनडेत दहावा विजय मिळवला होता. त्याच्यानंतर कपिल देव यांनी १५ सामन्यांमध्ये हा किर्तीमान केला होता. तर मोहम्मद अझरुद्दीन (१७ सामने), सौरव गांगुली (१९ सामने) यांनीही २० पेक्षा कमी डावांमध्ये १० विजय मिळवले होते. तसेच राहुल द्रविड (२० सामने), एमएस धोनी (२२ सामने), सचिन तेंडूलकर (२९ सामने) आणि सुनिल गावसकर (३३ सामने) हेदेखील या यादीमध्ये आहेत.

यानंतर आता उभय संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना ११ फेब्रुवारी रोजी होईल. हा सामना जिंकत वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत व्हाईटवॉश देण्यावर भारतीय संघाचा भर असेल. तर वेस्ट इंडिजचा संघही लाज वाचवण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. या वनडे मालिकेनंतर रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतही भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. हे सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

छोटेखानी खेळी करूनही कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रम, गांगुली- तेंडूलकरला पछाडत बनला ‘रनवीर’

मेहनतीला मिळाली कौतुकाची थाप, प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हिटमॅन म्हणतो ‘मी मायदेशात अशी गोलंदाजी..’

देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के! अंडर-१९ WC नंतर यश धूलसाठी आणखी एक आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---