भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शनिवारी (२६ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील दुसरा सामना (Second T20I) पार पडला. धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंकेला १८३ धावांवर रोखले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने सर्वाधिक ७५ धावा केल्या. या डावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इतिहास रचला. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा (Most Catches In T20I) पहिलाच भारतीय खेळाडू (First Indian Player) ठरला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या भारतीय संघासाठी पावरप्ले चांगला राहिला नाही. श्रीलंकेच्या सलामी जोडीने पहिल्या ५ षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. मात्र पुढे भारतीय संघानेही सामन्यात चांगले पुनरागमन केले. त्यांनी निर्धारित २० षटकांमध्ये श्रीलंकेच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यातील एक विकेट घेण्यात रोहितने हातभार लावला होता.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहितने श्रीलंकेचा यष्टीरक्षक दिनेश चंडिमल याचा ९ धावांवर झेल टिपला. पंधराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने हा पराक्रम केला होता. या झेलसह रोहितने त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ५० झेल पूर्ण केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये इतके झेल घेणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
Another day, another milestone! 🔥
5⃣0️⃣th catch for RO in T20Is – He becomes the first 🇮🇳 cricketer to achieve this feat! 👏#OneFamily #INDvSL @ImRo45 pic.twitter.com/mrKYTAJXYl
— Mumbai Indians (@mipaltan) February 26, 2022
या विक्रमात त्याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याची बरोबरी केली आहे. तर टी२० क्रिकेटमध्ये झेलचे अर्धशतक पूर्ण करणारा रोहित जगातील तिसरा खेळाडू बनला आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (६४ झेल) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर (६९ झेल) हे अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्थानावर आहेत.
शोएबवर भारी पडला रोहित
याखेरीज रोहितने पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याच्या विक्रमातही शोएब मलिकची बरोबरी केली आहे. हा रोहितचा १२४ वा टी२० सामना होता. या कामगिरीत मोहम्मद हाफिज (११९ सामने), ओएन मॉर्गन (११५ सामने) आणि महमुदुल्लाह (११३ सामने) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं
विरोधी संघातून कर्णधार रोहितचे तोंडभरून कौतुक; श्रीलंकन दिग्गज म्हणाला, ‘नव्या लीडरशीपची…’