लॉर्ड्स येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात तो भोपळाही न फोडता बाद झाला. ज्यानंतर त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात (ENG vs IND) इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात २४६ धावा केल्या. इंग्लंडच्या २४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला (Team India) चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेला भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित (Rohit Sharma) १० चेंडू खेळून शून्यावरच बाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलेने (Rees Topley) त्याला पायचीत केले.
अशाप्रकारे या वनडे सामन्यात खातेही न खोलता बाद होत रोहितने (Rohit Sharma Duck) भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांची बरोबरी केली आहे. द्रविड (Rahul Dravid) हेदेखील भारतीय वनडे संघाचे कर्णधार असताना लॉर्ड्स (Lords) येथे शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे रोहित आता लॉर्ड्सवरील वनडे सामन्यात शून्यावर बाद होणारा केवळ दुसराच भारतीय कर्णधार (Second Indian Captain) बनला आहे.
रोहितने जिंकून दिला होता भारताला पहिला वनडे सामना
असे असले तरीही, पहिल्या वनडे सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली होती. या सामन्यात त्याने ५८ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या होत्या. तसेच त्याने दुसरा सलामीवीर शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची अभेद्य भागीदारीही रचली होती. त्याच्या या ताबडतोब खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडचे १११ धावांचे आव्हान १८.४ षटकातच पूर्ण केले होते आणि १० विकेट्स राखून हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स वनडे| युझवेंद्र चहलच्या फिरकीपुढे इंग्लंड बेहाल, भारताला विजयासाठी २४७ धावांचे आव्हान
बलाढ्य इंग्लंडच्या त्रिकुटावर भारी पडला चहल, टीम इंडियाला मिळून दिल्या महत्वाच्या विकेट्स
WIvsIND | बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर वेगवान गोलंदाजीचा लिडर, अर्शदीप-आवेशही डागणार तोफा