भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये षटकारांच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी केला आहे. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूत तो आता अव्वल स्थानी पोहचला आहे. त्याने 600 षटकांराचा पल्ला गाठला आहे. हिटमॅन काल (5जून) झालेल्या टी20 विश्वचषकातील आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ही किर्ती मिळवली. त्याने 37 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यामध्ये 4 चाैकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
रोहित शर्माने 2007 साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 450 हून अधिक सामने खेळले आहेत. टी20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने 152 सामन्यांमध्ये 193 षटकार मारले आहेत आणि तो या फॉरमॅटमध्ये जगातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. दुसरीकडे, त्याच्या नावावर आतापर्यंत 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 323 षटकार आहेत. ‘हिटमॅन’ सध्या 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे कारण ख्रिस गेल (331) आणि शाहिद आफ्रिदी (351) त्याच्या पुढे आहेत. याशिवाय भारतीय संघाच्या विद्यमान कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये 84 षटकारही ठोकले आहेत. कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमापासून रोहित दूर असला तरी तो सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
रोहित शर्मा – 600*
ख्रिस गेल – 553
शाहिद आफ्रिदी – 476
ब्रेंडन मॅक्युलम – 398
मार्टिन गुप्टिल – 383*
एमएस धोनी – 359
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यात रोहित शर्माने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. आता टी20 इतिहासामध्ये 4000 धावा करणारा तो तिसरा खेळाडू बनला आहे. त्याआधी विराट कोहली बाबर आझमनी हा विक्रम केला आहे. रोहितने 152 टी20 सामन्यामध्ये 4026 धावा केल्या आहेत. विराट त्यापासून केवळ 12 धावा दूर आहे. कोहलीने 118 सामन्यात 4038 धावा केल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
‘कांगारुची’ ओमानवर वरचढ 39 धावांनी केला पराभव, मार्कस स्टाॅइनिसने गाजवले मैदान!
आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर बातमी
पहिल्याच सामन्यात भारताचा एकतर्फी विजय! आयर्लंडचा 8 विकेट्सनं उडवला धुव्वा