माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज तिसरा वऩडे सामना बे ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 243 धावा केल्या आहेत.
त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 244 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती. मात्र शिखर 28 धावांवर बाद झाला.
पण रोहित चांगला खेळत असून त्याने जेव्हा 21 वी धाव घेतली तेव्हा त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 हजार धावाही पूर्ण केल्या. तो अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा भारताचा 10 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत त्याने चौथे स्थानही मिळवले आहे. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा 260 डावात पूर्ण केला आहे.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली असून त्याने 219 डावात हा टप्पा गाठला होता.
आज(28 जानेवारी) सुरु असलेल्या सामन्यात रोहितने वनडे क्रिकेटमधील त्याचे 39 वे अर्धशतक 63 चेंडूत पूर्ण केले आहे.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू-
219 डाव – विराट कोहली
252 डाव – सौरव गांगुली
257 डाव – सचिन तेंडुलकर
260 डाव – रोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे एमएस धोनीला बसावे लागले तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर
–पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
–हार्दिक पंड्या झाला सुपरमॅन, घेतला न्यूझीलंडच्या कर्णधाराचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ