---Advertisement---

या कारणामुळे एमएस धोनीला बसावे लागले तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर

On: सोमवार, जानेवारी 28, 2019 12:49 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज तिसरा वऩडे सामना बे ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 243 धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला संधी देण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिक यष्टीरक्षण करेल. तसेच विजय शंकरच्या ऐवजी हार्दिक पंड्याला संघात संधी मिळाली आहे.

धोनीला संधी न मिळण्यामागील कारण सांगताना भारताचा कर्णधार विराट कोहली नाणेफेकीवेळी म्हणाला, ‘संघात काही बदल केले आहेत. धोनीला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला हा सामना मुकावा लागला आहे. तसेच हार्दिकला विजय शंकर ऐवजी संधी देण्यात आली आहे. त्याच्यामुळे संघात चांगला समतोल राखला जाईल.’
धोनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या लयीत खेळत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके केली होती. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही नाबाद 48 धावांची आक्रमक खेळी केली होती.

 

आज(28 जानेवारी) सुरु असलेल्या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि टॉम लॅथमने अर्धशतके केली आहेत. टेलरने 93 आणि लॅथमने 51 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

–पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात

–हार्दिक पंड्या झाला सुपरमॅन, घेतला न्यूझीलंडच्या कर्णधाराचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ

–राफाची बारी? नाही नाही, जोकरच भारी!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment