इंग्लंडविरुद्धचा साउथम्पटन येथे झालेला पहिला टी२० सामना ५० धावांनी जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने हा सामना जिंकला आहे. या सामना विजयानंतर कर्णधार रोहितच्या नावावर एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने आजवर कोणत्याही कर्णधाराला न जमलेली विलक्षण अशी कामगिरी केली आहे.
कर्णधार रोहित शर्माचा विश्विक्रम
टी२० विश्वचषक २०२१ नंतर रोहितने (Rohit Sharma) न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध संघाचे नेतृत्त्व करताना एकही सामना गमावला नव्हता. त्यानंतर आता परदेशातही कर्णधार म्हणून त्याने इंग्लंडविरुद्ध पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना जिंकला आहे. या विजयासह रोहित आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलग १३ सामने जिंकणारा (Rohit’s 13 Consecutive Win) भारताचाच नव्हे तर जगातील पहिलावहिला कर्णधार (First Ever Captain) बनला आहे.
त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील एकूण नेतृत्त्व कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत २९ टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी २५ सामने जिंकवून देण्यात त्याला यश आले आहे. तर केवळ ४ सामने त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने गमावले आहेत. त्याची टी२०तील विजयी सरासरी ८६.२० इतकी आहे.
याशिवाय भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनल्यापासून रोहितने १८ सामने खेळताना एकाही सामन्यात संघाला पराभवाचे तोंड दाखवलेले नाही.
🚨 Milestone Alert 🚨
First captain to win 1⃣3⃣ successive T20Is – Congratulations, @ImRo45. 👏 👏#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/izEGfIfFTn
— BCCI (@BCCI) July 7, 2022
हार्दिक पंड्याचे अष्टपैलू प्रदर्शन
दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या टी२० सामन्यात (IND vs ENG) प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९.३ षटकात १४८ धावांवरच गुंडाळला गेला. भारताकडून हार्दिक पंड्या याने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
हार्दिकने (Hardik Pandya) या सामन्यात फलंदाजी करताना ३३ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ६ चौकरही मारले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. तसेच त्याने गोलंदाजी करताना ४ षटके फेकत ४ विकेट्सही घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvsIND: हार्दिकच्या ‘अष्टपैलू’ प्रदर्शनाचा कहर, पहिल्या टी२०त भारताची इंग्लंडवर ५० धावांनी मात
अखेर अर्शदीपला संधी मिळालीच! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज