---Advertisement---

रोहितला जगातील टॅलेंटेड खेळाडू का म्हणतात त्याच कारण आज मिळालंच

On: बुधवार, ऑक्टोबर 2, 2019 3:13 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्यांदाच कसोटीत सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

रोहित या सामन्यातील दुसऱ्या सत्राखेर 174 चेंडूत 115 धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. रोहितचे हे कसोटी सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. त्यामुळे त्याने एक मोठा पराक्रम केला आहे.

तो सलामीवर म्हणून कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 या तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. याआधी कोणात्याही भारतीय सलामीवीराला या तीनही प्रकारात शतके करता आली नव्हती. पण रोहितने हा कारनामा आज केला आहे.

रोहितने आत्तापर्यंत सलामीवीर म्हणून वनडेत 25 शतके केली आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सलामीवीर म्हणून 4 शतके केली आहेत.

आजपासून विशाखापट्टणम येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत सलामीवीर रोहित आणि मयंक अगरवालने दुसऱ्या सत्राखेर 59.1 षटकात नाबाद 202 धावांची द्विशतकी भागीदारी केली आहे.

यामध्ये रोहितने नाबाद शतक केले आहे. तर  मयंक 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावांवर नाबाद आहे. सध्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ थांबवण्यात आला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा

‘सलामीवीर’ रोहित शर्माचे द. आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक पूर्ण…

कर्णधार कोहलीने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment