मुंबई। आज(२९आॅक्टोबर) भारताने विंडीज विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात २२४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने १३२ चेंडूत झंझावाती १६२ धावांची खेळी केली. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने उत्कृष्ठ साथ दिली.
या सामन्यात फलंदाजीत स्फोटक ठरलेल्या रोहितने क्षेत्ररक्षणातही तेवढीच चांगली कामगिरी केली. त्याने मार्लोन सॅम्यूएल्स(१८), फॅबिएन अॅलेन(१०) आणि अॅश्ले नर्स(८) यांचे झेल घेतले.
यावेळी एकाच वनडे सामन्यात १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा आणि ३ झेल अशी कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
रोहितचे त्याच्या कारकिर्दीतील २१वे तर रायडूचे ३रे वनडे शतक ठरले. तसेच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २११ धावांची भागीदारीही केली.
गोलंदाजीतही भारताने चांगली कामगिरी केली. खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येेेकी ३ विकेट्स घेतल्या. तर भूवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येेेकी १ विकेट्स घेतल्या.
भारताने दिलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संघ ३६.२ षटकात १५३ धावांवर गारद झाला. यामुळे पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला
–केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम
–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग
–चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय