ब्रिस्टल। रविवारी 8 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा आणि निर्णायक सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक करत मोलाची भुमिका निभावली.
याबरोबरच रोहितने या सामन्यात खास विक्रमांना गवसणीही घातली. रोहितने आक्रमक शतक करताना 56 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी20 मधील तिसरे शतक आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3 शतके करणारा रोहित हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तर एकूण दुसराच खेळाडू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचा कॉलीन मुनरोने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3 शतके केली आहेत.
तसेच रोहित हा क्रिकेटच्या तीनही प्रकारात प्रत्येकी 3 शतके करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा:
रोहितने आज आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा तो मिताली राज आणि विराट कोहली नंतरचा तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
तसेच पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तो 2000 धावा करणारा एकूण पाचवाच फलंदाज ठरला. याआधी 4 खेळाडूंनी 2000 धावा केल्या आहेत. यात न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्यूलम, मार्टीन गप्टील, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारतीय कर्णधार विराट कोहली आहे.
रोहितने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 84 सामन्यात 32.59 सरासरीने 2086 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारताने मालिका तर जिंकली पण हे ५ विक्रमही केले
-वाढदिवस विशेष- दुसरा गांगुली होणे नाही
-जेमतेम १७ आयपीएल मॅचेस खेळलेला खेळाडू करतोय भारताकडून पदार्पण