कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक खास विक्रम रचला आहे.
त्याने आज ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर तिसराच भारतीय खेळाडू ठरला. तसेच रोहित ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.
याआधी भारताकडून विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहितला आजच्या सामन्याआधी ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २६ धावांची गरज होती.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल ११०६८ धावांसह अव्वल क्रमांकावर असून न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या स्थानी आहे.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
ख्रिस गेल- ११०६८ धावा
ब्रेंडन मॅक्युलम- ८९९२ धावा
किरॉन पोलार्ड- ८०४८ धावा
शोएब मलिक- ७६७४ धावा
डेव्हिड वॉर्नर- ७६६८ धावा
ड्वेन स्मिथ- ७६०३ धावा
ब्रॅड हॉज- ७४०६ धावा
सुरेश रैना-७३७८ धावा
विराट कोहली- ७०९५ धावा
रोहित शर्मा- ७०००* धावा






