---Advertisement---

कर्णधार रोहितच्या ‘या’ निर्णयामुळे हारली इंडिया! पाकिस्तानचा घाम फोडणाऱ्या गोलंदाजालाच केले बाहेर

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 9:42 AM
Rohit Sharma Rishabah Pant Ravi Bishnoi
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील धडाकेबाज प्रदर्शनानंतर भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील त्यांचे पहिले दोन्हीही सामने गमावले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या करा अथवा मरा सामन्यातही भारताच्या हाती निराशाच आली. त्यांनी 6 विकेट्सने हा सामना गमावला. भारतीय संघाच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी बरेचसे खेळाडू जबाबदार राहिले. मात्र कर्णधार रोहित शर्मा सर्वात मोठा खलनायक ठरला. त्याचा एका खराब निर्णयामुळे भारतीय संघाला भारी नुकसान झाले आहे.

आशिया चषकातील भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनासाठी सर्वाधिक जबाबदार राहिली, प्लेइंग इलेव्हनची निवड. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन प्रत्येक सामन्यानंतर बदलत गेली. त्यातही श्रीलंकेविरुद्धच्या अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यात रोहितने आश्चर्यकारक निर्णय घेतले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील किफायतशीर गोलंदाजी करणाऱ्या रवी बिश्नोई याला श्रीलंकेविरुद्ध बाकावर बसवले. रोहितने त्याला बाहेर बसवत आर अश्विनला संघात जागा दिली.

बिश्नोईने पाकिस्तानच्या फलंदाजांचा काढला होता घाम
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खान आजारी असल्याने बिश्नोईला संघात सहभागी केले गेले होते. आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील बिश्नोईचा हा पहिलाच सामना होता. परंतु त्याने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने आपल्या कोट्यातील 4 षटके फेकताना फक्त 26 धावा खर्च केल्या आणि संघाला एक विकेटही मिळवून दिली होती. त्याने सर्वात चांगल्या 6.50 च्या इकोनॉमी रेटने धावा काढल्या होत्या.

दुसरीकडे भारताचे जवळपास सर्व अनुभवी गोलंदाज फ्लॉप ठरले होते. युझवेंद्र चहलने 4 षटकात 43 धावा खर्च केल्या होत्या. त्याने 10.80 च्या इकोनॉमीने या धावा दिल्या होत्या. तसेच भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या यांनीही 10 पेक्षा जास्त इकोनॉमीने धावा लुटल्या होत्या.

छोट्याश्या कारकिर्दीत केलीय करामत
बिश्नोईने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून 10 टी20 सामने खेळताना 16 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 7.09 राहिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवाने संतापले चाहते! थेट टीम इंडियाला बॉयकॉट करण्याची केली मागणी
टीम इंडियाचे गर्वहरण! श्रीलंकेने केला पराभव; अंतिम फेरीच्या आशा अंधूक
कार्तिकाला संघातून वगळलेच कशामुळे? पाकिस्तानी दिग्गजालाही वाटत आहे आश्चर्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---