---Advertisement---

पुन्हा एकदा रोहितच! टी२० क्रिकेटमध्ये कोहलीचा विक्रम केला आपल्या नावावर

On: शुक्रवार, जुलै 8, 2022 7:10 PM
rohit-virat-odi
---Advertisement---

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये जलद १ हजार धावा करण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने हा विक्रम इंग्लंडविरुद्ध केला. पहिल्या टी२० सामन्यात त्याने २४ धावांची खेळी केली होती.

 कर्णधार म्हणून रोहितने २९ डावात १००० टी२० धावा पुर्ण केल्या आहेत. कोहलीला कर्णधार म्हणून टी२० क्रिकेटमध्ये १ हजार बनवण्यासाठी ३० डाव घेतले होते.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ॲरॉन फिंचने सर्वाधिक १९७१ धावा केल्या आहेत. विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५० सामन्यात १५७० धावा केल्या आहेत. 

(ही बातमी ६० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---