भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. ह्या सामन्यात पहिल्या डावात भारताने भरभक्कम खेळी उभारली आणि इंग्लंडचा पहिला डाव लवकर गुंडाळला. तसेच दुसऱ्या डावात भारतीय संघाने आतापर्यंत पाऊणेचारशेची आघाडी घेतलीये. या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मात्र अपेक्षेसारखा खेळला नाही, किंवा त्याला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. असे असले तरीही दोन्ही डावात मिळून रोहितने केलेल्या धावांमुळे त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ( Rohit Sharma Breaks Virat Kohli Record Most Runs In WTC For India INDvsENG )
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अर्थात ‘हिटमॅन’ रोहित शर्माने विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. रोहितने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान गाठले आहे. इंग्लंड विरुद्ध वइझाग येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने पहिल्या डावात 41 चेंडूंचा सामना करत 14 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो 13 धावांवर बाद झाला. यात दुसऱ्या डावात 7 धावा करताच रोहित शर्माने विराट कोहलीचा एक रेकॉर्ड मोडून त्या यादीत सर्वोच्च स्थान गाठले आहे.
- रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराट कोहलीला मागे टाकून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 36 सामन्यांच्या 60 डावांमध्ये 39.21 च्या सरासरीने 2235 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या कालावधीत 4 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विराटची सर्वोच्च धावसंख्या 254* एवढी आहे.
तर , रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 29 सामन्यांमध्ये 49 डावांमध्ये 49.82 च्या सरासरीने 2242 धावा केल्या आहेत. ह्यासह रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 7 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 212 एवढी आहे.
दुसरीकडे मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा सध्या भारतीय संघविरुद्ध खेळत असलेल्या इंग्लंड संघातील फलंदाज जो रूट याच्या नावे आहे. जो रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 49 सामन्यांच्या 89 डावांमध्ये 49.06 च्या सरासरीने सर्वाधिक 4023 धावा केल्या आहेत.
WTC मध्ये सर्वाधिक धावा बनवणारे भारतीय फलंदाज :
1. रोहित शर्मा – 2242 धावा (49 डाव)
2. विराट कोहली – 2235 धावा (60 डाव)
3. चेतेश्वर पुजारा – 1769 धावा (62 डाव)
4. अजिंक्य रहाणे – 1589 धावा (49 डाव)
अधिक वाचा –
– बे&%$ कोई भी गार्डन मे घुमेगा; मॉं &%$# सबकी, रोहित शर्माची शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद
– IND vs ENG । भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड 253 धावांवर सर्वबाद, एकट्या बुमराहने घेतल्या 6 विकेट्स
– पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना