fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला टी20 सामना भारताने जिंकला असून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

तसेच विंडीज विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवल्याने भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा विंडीज विरुद्ध टी20 सामना जिंकणारा भारताचा केवळ तिसराच कर्णधार ठरला होता.

याआधी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी कर्णधार म्हणून विंडीज विरुद्ध प्रत्येकी एक विजय मिळवला आहे.

त्यामुळे जर भारताने आज विजय मिळवला तर रोहित विंडीज विरुद्ध दोन टी20 सामने जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरणार आहे.

भारत आणि विंडीज संघात आत्तापर्यंत 9 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील 5 सामन्यात विंडीजने बाजी मारली आहे. तर भारताला केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विंडीज विरुद्ध 2014 मध्ये टी20 सामना जिंकला आहे. हा सामना टी20 विश्वचषकात झाला होता.

तसेच त्याआधी भारताने 2011 मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली विंडीज विरुद्ध पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवला होता.

विंडीज विरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती प्रभारी कर्णधार रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम

भारतीय साॅफ्टवेअर इंजिनीअर झाला अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार

You might also like