रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांमध्ये आमना सामना होणार आहे. चाहते या सामन्याचा वाट मागच्या मोठ्या काळापासून पाहत होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा सामना असेल. तर दुसरीकडे संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा देखील या सामन्यात मोठी कामगिरी करू शकतो.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (Martin Guptill) पहिल्या क्रमांकावर आहे. गप्टिलने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 3497 धावा केल्या आहेत. रोहित या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर एकूण 3487 टी-20 धावांची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 3308 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते समाधानकार नाहीये. त्याने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 7 डावांमध्ये 14 च्या सरासरीने 70 धावा केल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याची सर्वाधिक धावसंख्या 30 राहिली आहे आणि स्ट्राईक रेट 127.27 चा आहे. तो पाकिस्तानविरुद्ध दोन वेळा शून्यावर देखील बाद झाला आहे. रोहितने ज्या संघाविरुद्ध कमीत कमी पाच डाव खेळले आहेत, त्यापैकी सर्वात कमी धावा पाकिस्तानविरुद्धच केल्या आहेत.
पाकिस्तान संघानंतर रोहितने श्रीलंकन संघाविरुद्ध सर्वात खराब खेळी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या 16 टी-20 डावांमध्ये 21.19 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 16 टी-20 डावांमध्ये त्याने 22.71 च्या सरासरीने 318 धावा केल्या आहेत. असे असले तरी, श्रीलंकेविरुद्ध त्याने 118 धावांची महत्वाची खेळी नक्कीच केली आहे. मात्र, एकंदरीत आकडेवारी पाहिली, तर ती रोहितच्या प्रतिष्ठेप्रमाणे नाहीये. अशात शनिवारी सुरू झालेल्या आशिया चषकात त्याच्याकडे पाकिस्तान आणि श्रीलंका संघासविरुद्ध स्वतःचे प्रदर्शन सुधारण्याची संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvPAK: ‘रनसंग्रामा’पूर्वी सूर्यकुमारने दिली मोठी प्रतिक्रिया; “हा सामना म्हणजे आमच्यासाठी…”
मैदानात टीम आणि मैदानाबाहेर कोच एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज, एकदा आकडेवारी पाहाच
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत