वेलिंगटन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्या(3 फेब्रुवारी) पाचवा आणि शेवटचा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंगटन येथे होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
उद्या होणाऱ्या या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर अशा दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.
त्याने जर उद्या 194 धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा पार करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरेल.
रोहितने आत्तापर्यंत 200 वनडे सामन्यातील 194 डावात 47.88च्या सरासरीने 7806 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 175 डावात हा टप्पा गाठला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आहे. त्याने 182 डावात हा टप्पा पार केला होता.
तसेच सध्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याने 200 डावात वनडेमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे गांगुलीला मागे टाकण्यासाठी रोहितकडे अजून 5 डाव बाकी आहेत.
वनडेमध्ये सर्वात जलज 8000 धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू –
175 डाव – विराट कोहली
182 डाव – एबी डिविलियर्स
200 डाव – सौरव गांगुली
210 डाव – सचिन तेंडुलकर
211 डाव – ब्रायन लारा
महत्त्वाच्या बातम्या-
–तो जागतिक विक्रम रोहित शर्मासाठी केवळ हाकेच्या अंतरावर
–वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!
–काय सांगता! अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या स्कूलमेट