श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना तब्बल 43 दिवसांचा ब्रेक मिळाला. विश्रांतीनंतर टीम इंडिया आता 19 सप्टेंबरपासून घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर असतील. या मालिकेत रोहितकडे मोठा विक्रम करण्याची संधी असेल. रोहितनं या मालिकेत 7 षटकार मारले तर तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल.
रोहित शर्मा या बाबतीत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकेल. सोहवागनं भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 90 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या नावे आतापर्यंत 59 कसोटी सामन्यामध्ये 84 षटकार आहेत. या यादीत महेंद्रसिंग धोनी 78 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर चौथ्या आणि रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय (डाव)
वीरेंद्र सेहवाग – 90 (178)
रोहित शर्मा – 84 (101)
महेंद्रसिंह धोनी- 78 (144)
सचिन तेंडुलकर – 69 (329)
रवींद्र जडेजा – 64 (105)
रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. 37 वर्षीय रोहितनं तिन्ही फॉरमॅटसह एकूण 483 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं एकूण 620 षटकार मारले. यासह रोहित हा टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. रोहितनं 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 205 षटकार मारले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या नावावर 265 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 331 षटकार आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. स्टोक्सनं आतापर्यंत 190 कसोटी डावांमध्ये 131 षटकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम (176 डावात 107 षटकार) आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲडम गिलख्रिस्ट (137 डावात 100 षटकार) यांचा नंबर लागतो.
हेही वाचा –
हीच पाकिस्तानची ओळख! अशी कॅच सोडली, ज्यावर अंपायरचाही विश्वास बसेना
‘बेझबॉल’ फक्त नावालाच! टीम इंडियाच्या ‘सिक्स हिटिंग’समोर इतर सर्व संघ फेल
5 दिग्गज क्रिकेटपटूंचे मुलं ज्यांना वडिलांप्रमाणे यश मिळालं नाही, अवघ्या काही सामन्यांमध्ये संपली कारकीर्द