नुकताच भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौरा संपन्न झाला. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने तर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता ही मालिका झाल्यानंतर भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जोरदार तयारी सुरू केली आहे.
बीसीसीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “रोहित शर्मा (Rohit Sharma) वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी फिट असून तो या मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेपर्यंत रोहित शर्माला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये साडे सात आठवड्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल. त्याने मुंबईमध्ये जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. फिटनेस चाचणीसाठी तो बंगळुरूला जाण्याची आणि राष्ट्रीय क्रिकेट ॲकेडमीकडून औपचारिक मान्यता मिळवण्याची अपेक्षा आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहूलला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, आता ही जबाबदारी रोहित शर्मा पार पाडणार आहे. केएल राहुलला रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली खेळावे लागणार आहे. केएल राहुलकडून कर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. परंतु, तो असं काहीच करू शकला नाही.
अधिक वाचा – “जर रोहित फिट असेल, तर त्याला कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार का बनवले जाऊ शकत नाही?”
तसेच सूत्राने पुढे म्हटले की, “तुम्हाला माहित आहे की, आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर हार्दिक पंड्याला संघाबाहेर करण्यात आले होते. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, तो असे काहीच करू शकला नाही. परंतु, तो एक चांगला खेळाडू आहे, त्याला अधिक काळ संघाबाहेर ठेवता येणार नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध नाही श्रीलंकेविरुद्ध तो नक्की पुनरागमन करेल.”
व्हिडिओ पाहा – रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा
तसेच सतत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच आर अश्विनला आणखी एक संधी दिली जाऊ शकते कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली मालिका ही त्याची पुनरागमन केल्यानंतरची पहिलीच मालिका होती.
महत्वाच्या बातम्या;
‘या’ पंचांच्या डोक्यावर सजला ‘आयसीसी अंपायर ऑफ द इयर’चा ताज; भारत-द. आफ्रिका वनडे ठरलेला शतकी सामना
हे नक्की पाहा: