भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा आज ३३ वा वाढदिवस आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूर येथे झाला. पण तो लहान असतानाच त्याचे पालक मुंबईला स्थायिक झाले.
रोहित महाराष्ट्रात लहानपणापासून वाढला असल्याने त्याला मराठी चांगले बोलता येते. तसेच तो हिंदी आणि इंग्रजी भाषाही चांगला बोलतो. एवढेच नाही तर रोहितला तेलुगू भाषाही बोलता येते. कारण रोहितची आई मुळची विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथील आहे. त्यामुळे रोहितला तेलुगू भाषेचीही ओळख झाली.
रोहितने आत्तापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले असून ४६.५४ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २२४ वनडे सामन्यात ४९.२७ च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत.
रोहित हा भारताकडून सर्वाधिक टी२० सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने १०८ टी२० सामने खेळले असून ३२.६२ च्या सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९ शतके केली आहेत.