वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्यापासून(6 फेब्रुवारी) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये वेस्टपॅक स्टेडियमवर होणार आहे.
या टी20 मालिकेत भारतीय संघाच नेतृत्व नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. त्यामुळे त्याला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
रोहितने जर या मालिकेत 44 धावा केल्या तर तो भारताकडून कर्णधार म्हणून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येईल. याबरोबरच तो विराटला मागे टाकेल.
सध्या रोहितने भारताचे 12 टी20 सामन्यात नेतृत्व करताना 42.45 च्या सरासरीने 467 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराटने कर्णधार म्हणून 20 टी20 सामन्यात 34 च्या सरासरीने 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 510 धावा केल्या आहेत.
भारताकडून कर्णधार म्हणून टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने 72 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना 37.6 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार-
1112 – एमएस धोनी (72सामने)
510 – विराट कोहली (20 सामने)
467 – रोहित शर्मा (12 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीला टी२०त तो महत्त्वाचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर
–टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी






