---Advertisement---

‘टोपी सांभाळू शकत नाहीये, संघ कसा सांभाळशील’, रोहित शर्माच्या डोक्यावरून २ वेळा घसरली टोपी

On: रविवार, मार्च 13, 2022 5:15 PM
---Advertisement---

क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाज, गोलंदाजांच्या विक्रमांशिवाय बऱ्याच गंभीर किंवा मजेशीर घटना घडताना दिसतात. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरू येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा व शेवटचा (Second Test) सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत मजेशीर घटना घडली आहे. यावरून भारतीय क्रिकेटप्रेमी त्याला ट्रोलही करत आहेत.

तर झाले असे की, उभय संघातील दिवस-रात्र कसोटी सामना (Day-Night Test) सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ वार्म अप (Team India Warming Up) करत होता. यावेळी सर्व खेळाडू धावत मैदानाचा फेरा मारत होते. यावेळी रोहित रखरखत्या उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी गोल टोपी घालून मजेत धावत होता. परंतु जोरदार हवेमुळे त्याच्या डोक्यावरची टोपी (Hat Fall Down Twice) उडून खाली पडली. यानंतर त्याच्या मागे धावत असलेल्या रिषभ पंतने टोपीला पकडले आणि रोहितकडे टोपी सोपवली. 

मग रोहितने पुन्हा टोपी घातली आणि तो इतर खेळाडूंसोबत धावायला लागला. परंतु पुन्हा एकदा वाऱ्यामुळे रोहितची टोपी खाली पडली. रोहितसोबत घडलेल्या या मजेदार प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. काहींना त्याला यावरून ट्रोलही केले आहे.

एका चाहत्याने हसतानाचा इमोजी जोडत लिहिले आहे की, ‘टोपी सांभाळू शकत नाहीये, संघाला कसा सांभाळशील.’ तर एकाने गजब ‘टोपीबाज माणूस’ अशी गमतीशीर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

https://twitter.com/AnkitDand01/status/1502872211019149314?s=20&t=hJ4ETn7oGwstPfIIsDp0mA

रोहित फलंदाज म्हणून ठरतोय फ्लॉप
रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे हाती घेतली आहे. त्याने या सामन्यात भारतीय संघाला मोठा विजयही मिळवून दिला आहे. परंतु तो कर्णधार बनल्यापासून फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकलेला नाही. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केवळ १५ धावांवर विकेट गमावली होती. तत्पूर्वी पहिल्या कसोटी सामन्यात तो फक्त २९ धावा करू शकला होता.

केवळ कसोटीतच नव्हे तर त्याची एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजी कामगिरीही बिघडली आहे. त्याने जानेवारी २०२२ पासून ते आतापर्यंत ११ सामने खेळताना केवळ २८४ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कडक ना भावा! श्रेयस अय्यरने चेंडू डायरेक्ट स्टेडियम बाहेर मारत पूर्ण केले अर्धशतक, पाहा व्हिडिओ

दर्शकाचं नाक फ्रॅक्चर, प्रतिस्पर्धी खेळाडू जखमी; निकालाआधीच रोहितने बंगळुरु कसोटी बनवलीये ‘यादगार’

श्रीमंत आयपीएलमधील संघही थांबलेत मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये; ताज पॅलेस ‘या’ संघाच्या वाट्याला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---