भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मानं गेल्या 5 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत. यानंतर रोहितच्या कर्णधारपदावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गाबा येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीनंतर टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा केली होती. आता रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
खरं तर, टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मानं कर्णधारपद सोडण्याबाबत बोलले आहेत. गावस्कर रोहितच्या खराब फॉर्मबद्दलही बोलले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मानं केवळ 6.33 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी मालिकेतही रोहित शर्माचा फॉर्म खूपच खराब होता.
‘एबीसी स्पोर्ट्स’शी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “मला वाटतं की पुढील काही सामन्यांमध्ये रोहितला खेळण्याची संधी मिळेल, हे निश्चित आहे. पण कदाचित जर त्यानं धावा केल्या नाहीत, तर मला वाटतं की तो स्वत: निर्णय घेईल.” सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहितनं धावा न केल्यास त्यानं स्वतः निर्णय घ्यावा. गावस्कर म्हणाले, “तो एक अतिशय प्रामाणिक क्रिकेटपटू आहे. त्याला संघावर ओझं बनणं आवडणार नाही. तो भारतीय क्रिकेटचा विचार करणारा क्रिकेटपटू आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांमध्ये त्यानं धावा केल्या नाहीत तर मला वाटतं की तो स्वतःहून पायउतार होईल.”
रोहित शर्मानं 2024 मध्ये आतापर्यंत 13 कसोटी खेळल्या आहेत. याच्या 24 डावांमध्ये रोहितनं 26.39 च्या सरासरीनं 607 धावा केल्या. या कालावधीत त्यानं 2 शतके आणि 2 अर्धशतकं झळकावली.
हेही वाचा –
आर अश्विनच्या निवृत्तीवर काय म्हणाला पॅट कमिन्स? कांगारु कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
अश्विननं कसोटीत धोनीपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत? आकडेवारी जाणून बसेल धक्का!
आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस