---Advertisement---

रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO

On: सोमवार, सप्टेंबर 30, 2024 11:23 AM
---Advertisement---

कानपूर कसोटीचा आज चौथा दिवस आहे. दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला होता. आता चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.

दिवसाच्या पहिल्याच सत्रात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची जादू पाहायला मिळाली. रोहितनं बांगलादेशचा फलंदाज लिटन दास याचा एक धक्कादायक झेल घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. रोहितनं हवेत उडी मारून एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. हा झेल पाहून भारतीय खेळाडूंसह लिटन दास देखील अवाक् झाला.

वास्तविक, सामन्याच्या 50व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. तेव्हा बांगलादेशची धावसंख्या 148/4 अशी होती. लिटन दास आणि मोमिनूल हक क्रिजवर होते. सिराजनं षटकाचा चौथा चेंडू टाकला, ज्यावर लिटननं आऊट-स्टेप करून इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू मिड-ऑफवर गेला, जेथे रोहितनं त्याच्या एका हातानं आश्चर्यकारक झेल घेतला.

हा झेल घेतल्यावर स्वत: रोहित देखील क्षणभर चकित झाला होता. या चेंडूपूर्वी त्यानं खास रणनीती बनवली होती. लिटन दासला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्यानं आधी कोहलीला एक्स्ट्रा कव्हरवर उभं केलं होतं. रोहितच्या या जाळ्यात बांगलादेशचा हा यष्टीरक्षक फलंदाज अलगद अडकला. तो 30 चेंडूत 13 धावा करून बाद झाला.

रोहित शर्माच्या या झेलवर शुबमन गिलची प्रतिक्रिया जबरदस्त होती. त्यानं चक्क आपल्या डोक्यालाच हात लावला. कर्णधारानं एवढा खतरनाक झेल घेतला, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. रोहितचा झेल पाहून मोहम्मद सिराज आणि विराट कोहली देखील शॉकमध्ये होते. या सगळ्यांच्या आपण काय पाहिलं, हे कळतच नव्हतं. रोहितच्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.

 

हेही वाचा – 

विध्वसंक! आयपीएल मेगा लिलावापूर्वी कॅरेबियन खेळाडूची शतकी खेळी; संघाचा मोठा विजय
टी20 विश्वचषकात भारताची शानदार सुरुवात, सराव सामन्यात वेस्ट इंडिजला नमवले
IRE vs SA: आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी; दक्षिण आफ्रिकेची शरणागती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---