टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अत्यंत मनोरंजक पद्धतीनं ट्रॉफी उचलण्यासाठी पोहोचला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, की रोहितला अशा पद्धतीनं ट्रॉफी उचलायला कुलदीप यादवनं सांगितलं होतं? यामागे एक खास स्टोरी आहे जी आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
वास्तविक, रोहित शर्मानं ज्या शैलीनं ट्रॉफी उचलली, ती महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची शैली आहे. मेस्सीनं 2022 चा फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर या शैलीनं ट्रॉफी उचलून सेलिब्रेशन केलं होतं. आता भारतीय संघानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मानं त्याचं अनुकरण केलं. रोहितला असं करण्याचा सल्ला फिरकीपटू कुलदीप यादवनं दिला होता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये कुलदीप रोहितला ट्रॉफी कशी उचलायची हे शिकवताना दिसत आहे. कुलदीप हा फुटबॉलचा खूप मोठा फॅन आहे. बार्सिलोना हा त्याचा आवडता क्लब असून मेस्सी त्याचा आवडता फुटबॉलपटू आहे. त्यामुळे कुलदीपनं रोहितला मेस्सीची शैली शिकवली.
रोहित जेव्हा ट्रॉफी घ्यायला पोडियमच्या दिशेनं गेला, तेव्हा तो मेस्सीप्रमाणे हळूहळू पुढे सरकला. विराट कोहलीसह संपूर्ण संघानं त्याच्या या स्टाईलचा आनंद लुटला. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
— 👑 (@lmaooppop) June 30, 2024
View this post on Instagram
फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडू खूपच भावूक झाले होते. हार्दिक पांड्या ढसाढसा रडला तर रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला देखील अश्रू आवरले नाही.
भारतीय संघानं टी20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना 7 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 169 धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे फिरला सामना! जय शाहंच्या हस्ते मिळाला विशेष पुरस्कार
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पत्नीनं घेतली मुलाखत पण बुमराहला शब्द फुटेना, पाहा मैदानावरील व्हिडिओ
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमारच्या पत्नीनं शेअर केली एक खास पोस्ट…!