भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2023चा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. उभय संघांतील या लढतीसाठी चाहते उत्सुक आहेत. कारण दोन्ही संघ आशिया चषकाता जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तत्पूर्वी शनिवारी (16 सप्टेंबर) भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांचा खास व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय संघ (Team India) आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वोत यशस्वा संघ राहिला आहे. भारताने आतापर्यंत सात आशिया चषक ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावर्षी इतिहासातील आठवा आशिया चषक (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतो. शुबमन गिल (Shubman Gill) याने मागच्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले होते. मात्र, संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
रविवारी (16 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल यांच्यातील जो खास व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात रोहित काहीसा रागात दिसतो. व्हायरल व्हिडिओत गिल रोहितला काहीतरी विचारत आहे. यावर कर्णधार रोहितने त्याला स्पष्ट नकार दिल्याचे दिसते. “माझ्याकडून नाही होणार, वेडा आहेस का?” हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. अनेकांंनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Rohit Sharma to Shubman Gill – “I can’t do it, are you crazy?!”.
What would Gill have asked? ????pic.twitter.com/mdiTqJBFzL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 16, 2023
दरम्यान, भारताने आशिया चषकाच्या सुपर फोरमधील तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला. शेवटचा सामना भारताने बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सने गमावला. दुसरीकडे श्रीलंकन संघानेही सुपर फोरमधील तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने आपला शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध दोन विकेट्स राखून जिंकला आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. पाकिस्तन संघाने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण अखेर विजय यजमान श्रीलंकेला मिळाला. (Rohit Sharma clearly refused Shubman Gill’s demand)
महत्वाच्या बातम्या –
“एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता तर…”, गंभीरचे मोठे वक्तव्य
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबत क्रीडा मंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘दहशतवाद…’