फलंदाजांचे नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर आज (३ नोव्हेंबर) साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघातील या सामन्याद्वारे प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ कोणता असेल हे कळेल. या रोमांचक सामन्यातून चाहत्यांसाठी एका आनंदाची बातमी पुढे आली आहे. ती म्हणजे, दुखापतीमुळे मागील काही सामन्यांतून बाहेर असलेला मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले आहे.
सामन्यापुर्वी दोन्ही संघांमध्ये झालेल्या नाणेफेकीवेळी रोहित आला होता. त्यामुळे या सामन्यात तो खेळताना दिसणार असल्याचे सर्वांना समजले. रोहितच्या पुनरागमनामुळे हैदराबादविरुद्ध कायरन पोलार्डऐवजी तो संघांच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळताना दिसेल.
रोहितने या सामन्यात ३ बदल केले आहेत. त्याने जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टला विश्रांती दिली आहे. बुमराहच्या जागी धवल कुलकर्णीला, तर बोल्टच्या जागी जेम्स पॅटिन्सला संधी दिली आहे. सोबतच रोहितने जयंतला विश्रांती देत त्याच्या जागी स्वत: संघात सामील झाला आहे.
काही दिवसांपुर्वी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या साखळी फेरी सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर पुढील काही सामन्यात तो खेळताना दिसला नाही. त्याच्याऐवजी संघाचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डला कर्णधार बनवण्यात आले होते.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), क्विटंन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, इशान किशन, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, जेम्स पॅटिसन, धवल कुलकर्णी
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
डेविड वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या-
”या’ विश्वविजेत्या कर्णधाराला मी ड्रग्स घेताना पाहिलंय’, माजी क्रिकेटपटूचा सणसणीत खुलासा
कोहली- गांगुली अडचणीत; मद्रास उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
असं कसं काय रे भावा! फायनल आधी सेमीफायनल नाही तर प्ले-ऑफ, जाणून घ्या पूर्ण नियम