वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात दिली. दोघांनी दिलेल्या आक्रमक सुरुवातीमुळे भारतीय संघाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने झेप घेतली. रोहितने अवघ्या १६ चेंडूवर ३३ खेळी करताना मोठे पराक्रम नोंदविले.
रोहित-सूर्यकुमारची तुफानी सलामी
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. संपूर्ण मालिकेत सलामीवीराची भूमिका बजावलेल्या रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी ४.४ षटकात ५३ धावांची सलामी दिली. रोहितने बाद होण्यापूर्वी केवळ १६ चेंडूवर ३३ धावा चोपल्या. यामध्ये दोन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता.
रोहितने आपल्या या छोटेखानी खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६, ००० धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहितने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३,१३७ धावा काढल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ९,३७३ आणि टी२० मध्ये ३,४८७ धावा आहेत. रोहित २००७ पासून भारतीय संघासाठी खेळत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोळा हजार धावा करणारा रोहित सातवा भारतीय फलंदाज बनला. त्याच्यापूर्वी या यादीमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरने (३४,३५७ धावा) आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे राहुल द्रविड (२४,२०८ धावा) व विराट कोहली (२३,७२६ धावा) आहेत. त्यांच्यापाठोपाठ सौरव गांगुली (१८,५७५ धावा), एमएस धोनी (१७,२६६ धावा) व वीरेंद्र सेहवाग (१७,२५३ धावा) यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’
इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब